'बिग बॉस-६'मध्ये हॉट किम कारदिशिया? - Marathi News 24taas.com

'बिग बॉस-६'मध्ये हॉट किम कारदिशिया?

www.24taas.com, मुंबई
 
'बिग बॉस' या रिऍलिटी शोच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. अमेरिकेची वादग्रस्त सेलिब्रिटी किम कारदिशियान बिग बॉसच्या सहाव्या पर्वात येणार असल्याची चर्चा आहे. नेहमीच वादात अडकणाऱ्या किमने नुकताच आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. तिचं क्रिस हम्प्रिसबरोबरचं लग्न केवळ ७२ दिवस टिकलं.
 
जर किम बिग-बॉस ६ मध्ये सहभागी झाली, तर तो तिचा पहिला भारतीय टीव्ही शो असेल. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तिने ४.५ कोटी रुपये मागितले आहेत. एंडमॉल इंडियाचे सीईओ दीपक धर म्हणाले, “बिग बॉसच्या साहव्या भागासाठी आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींशी बोलणी करत आहोत. मात्र अजून काही नक्की ठरलेलं नाही”
 
नुकत्याच आपल्या रिऍलिटी शोमध्ये किमने भारतीय अन्नाला नावं ठेवली होती. तिला भारतीय अन्न आवडत नसल्याचं म्हणताच ट्विटरवर तिच्यावर बरीच टीका करण्यात आली होती.
 

पाहा हॉट किम कारदिशियाचे फोटो



 
 
 

First Published: Monday, June 18, 2012, 17:28


comments powered by Disqus