Last Updated: Wednesday, June 20, 2012, 12:57
www.24taas.com 
घना राधातले खोटे रुसवे फुगवे दूर होतात आणि दोघेही पुन्हा नवीन सुरुवात करतात. राधा घनाकडे रहायला येते आणि तिला पहायला मिळतो अगदी वेगळा घनश्याम. घनाच्या बोलण्यामुळे राधा दुखावली गेली आहे.
याची जाणीव घानाला होते आणि न राहावून तो राधाची चक्क माफी मागतो. राधाही घनाचं हे बदललेलं रुप पाहून सुखावते. आपल्या घरी जाताना ती पपांचा निरोप घेते तेव्हा तिची चांगलीच कान उघाडणी होते. दुसरीकडे राधा येणार या आनंदात घनश्याम चांगलाच तयारीला लागतो. स्वत: खोली आवरुन तो राधाच्या येण्याची जय्यत तयारी करतो. आल्यावर तिला सरप्राईज देण्यासाठी चांगलाच खटाटोपंही करतो.
बदललेला घनश्याम पाहून राधाला सुखद धक्काच बसतो.. घनश्याचं रोमॅण्टिक वागणं राधाला सुखावत असलं तरी तिला बुचकळ्यात टाकतं. प्रॅक्टिकल वागणारा घना खरा की राधासाठी झुरणारा घनश्याम खरा असा गोड प्रश्न राधाला पडतो... बघुयात येत्या काही दिवसात राधाला याचं उत्तर सापडतं का?
First Published: Wednesday, June 20, 2012, 12:57