किमचा कारनामा, सेक्सचा आनंद वाटला घ्यावा - Marathi News 24taas.com

किमचा कारनामा, सेक्सचा आनंद वाटला घ्यावा

www.24taas.com
 
टीव्ही स्टार किम कारदिशियाने आपल्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टींचा बिनधास्तपणे खुलासा केला आहे.  एका मुलाखतीत तिने तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहे. फक्त १५ वर्षांची असताना मला सेक्स करावासा वाटत होता. मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली, आईनेही ही गोष्ट करायला मला होकार दिला आणि म्हणाली की, जर तुला हे करायचे आहे तर मी तुला आधी बर्थ कंट्रोलविषयी समजावून सांगते, आणि नंतर तुला जे हवे ते तू कर." त्यामुळे तिने तेव्हा सेक्स केला असल्याची परवानगी दिली होती.
 
किम आपल्या जुन्या सेक्स लाईफविषयी बिनधास्तपणे बोलली.  किमला क्रिस हम्फ्रीजबरोबरच्या तिच्या संबंधाविषयी विचारले असता, तिने  प्रामाणिकपणे सांगितले की, तिला लग्न टिकवून ठेवायचे होते, मात्र घटस्फोटाआधी अतिचिंतेमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. ३२ वर्षीय किमने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बास्केटबॉल स्टार क्रिस हम्फ्रीजबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांचे हे लग्न फक्त ७२ दिवसच टिकू शकले.
 
सध्या किम कान्या वेस्टबरोबर डेटिंग करत आहे. ओप्रा विन्फेच्या शोवर किमने कबुली दिली की, हम्फ्रीज तिच्या योग्य नव्हता. मात्र तरीही तिने लग्न टिकवून ठेवण्याचा भरपूर प्रयत्न केला, मात्र तसे होऊ शकले नाही.
 
 
 
 
 

First Published: Thursday, June 21, 2012, 12:09


comments powered by Disqus