'एका लग्नाची दुसरी गोष्ट' राधाचं आता कसं होणार? - Marathi News 24taas.com

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' राधाचं आता कसं होणार?

www.24taas.com
 
'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका आता रंजक वळणावर आली. एकीकडे अमेरिकेत जाण्याचा विचार घनाच्या मनात घोळतो तर दुसरीकडे, घनश्याम आणि राधाच्या नात्यातली जवळीक आणखीनच वाढली.
 
राधा घनश्यामकडे बाहेर भेटण्याची मागणी करते. आजवर घना-राधा नेहमीच त्यांच्यातले प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी बाहेर भेटले आहेत. त्यामुळे यावेळीही असंच काही घडत नाहीएना अशी शंका घनाला आली. मात्र, यावेळी असं काहीही नसल्याचं राधा घनश्यामला सांगते आणि तोसुद्धा तिला भेटण्यास तयार होतो.
 
इतकंच कशाला तर घनश्याम संपूर्ण दिवसाचं प्लॅनिंगही करतो. आणि हे सगळं ऐकून राधा आपल्या बालणपणीच्या आठवणींमध्ये रमते. एकूणंच राधा-घनाच्या आयुष्यात आलेले हे रोमॅण्टिक क्षण त्या दोघांना एकत्र आणणार का? याचीच प्रतिक्षा करुया...
 
 
 
 
 

First Published: Monday, June 25, 2012, 21:44


comments powered by Disqus