Last Updated: Tuesday, June 26, 2012, 16:55
www.24taas.com, मुंबई एका खाजगी चॅनलवर येणारा ‘वीणा का स्वयंवर’ या रिअॅलिटी शोसाठी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक भलतीच खूश होती. पण, या चॅनलनं हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि तशी घोषणाही केली. हे ऐकल्यावर मात्र वीणा खूपच दु:खी झालीय. लग्नाच्या बाबतीत आपलं नशीब भलतंच वाईट आहे, असंही तिला आता वाटायला लागलंय.
‘बीग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये झळकल्यानंतर ‘वीणा का स्वयंवर’ हा वीणाचा दुसरा रिअलिटी शो ठरणार होता. पण, वीणाचं लग्नाचं स्वप्न या शोच्या माध्यमातून साकार होणार असं वाटत असतानाच हा शो स्थगित झाला. निराश झालेली वीणा म्हणते, ‘मी १४ वर्षांची असल्यापासून माझे आई-वडिल माझ्या लग्नाच्या तयारीला लागले होते. त्यांनी माझा संसार थाटून देण्याचे हरएक प्रयत्न केले पण मीच त्या प्रयत्नांना खोडा घातला. स्वयंवराची बातमी ऐकून खूश झालेल्या माझ्या अब्बूंनी आणि मित्रांनी मला यासाठी साथ दिली. आणि मी जेव्हा लग्नाला तयार झाले तेव्हा ते होऊच शकलं नाही. मला वाटतं लग्नाच्या बाबतीत माझं नशीबच वाईट आहे. माझं लग्न अनेकवेळा स्थगितच होत राहिलंय. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं ऐकून माझे वडिल तर आणखीनच उदास झालेत’.
‘पण, शो स्थगित झालेली बातमी मॅनेजरकडून मला कळली तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं नाही. कारण ही काही माझ्यासाठी पहिली वेळ नव्हती. जीवनात असं होतंच असतं. मी खूप सकारात्मक विचार करते. लग्नानंतर एखाद्या व्यक्तीसोबत राहणं, एकत्रच म्हातारं होणं... हे एक सुंदर नातं असतं,’ असं देखील वीणानं म्हटलंय. दिग्दर्शक हेमंत मधुकरबरोबर सध्या बऱ्याचदा आपला वेळ घालवताना दिसते. हेमंतच्या ‘मुंबई १२५ किमी’मध्ये ती काम करतेय. तसंच ‘द डर्टी पिक्चर’चा कन्नड रिमेकमध्येही वीणा दिसणार आहे.
.
First Published: Tuesday, June 26, 2012, 16:55