'एका लग्नाची दुसरी गोष्टी' 'राधा' तू हे काय केलं? - Marathi News 24taas.com

'एका लग्नाची दुसरी गोष्टी' 'राधा' तू हे काय केलं?

www.24taas.com
 
एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत आला एक सॉलिड ट्विस्ट.. अखेर राधाने घनश्यामकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली. आमच्यात प्रेम नाही, आम्ही खूप प्रॅक्टीकल आहोत असं म्हणता म्हणता अखेर राधा घनश्यामच्या प्रेमात पडली.
 
आणि हे  घनश्यामला सांगायचा विचार राधा करत असतानाच अचानक घनश्याम तिकडे येतो. आणि घडतं काहीसं वेगळं राधाही अगदी आनंदाने घनाच्या मीठीत विसावते. मात्र, लगेचच भानावर येत घनश्याम राधाला आपल्यापासून दूर करतो. मात्र, इथेच मालिकेत येतो एक ट्विस्ट.. अखेर राधा घनश्यामकडे आपल्या प्रेमाची कबूली देते.
 
राधाचं हे बोलणं ऐकून घनासुद्धा गोंधळून जातो. चला राधाने तर अपने प्यार का इजहार कर दिया. मात्र, आता घनश्याम राधाचं प्रेम स्विकारणार का? तोसुद्धा आपल्या प्रेमाची कबूली राधाला देणार का? यासाठी अजून थोडी प्रतिक्षा करावीच लागणार आहे..
 
 
 

First Published: Wednesday, July 4, 2012, 08:17


comments powered by Disqus