Last Updated: Wednesday, December 14, 2011, 15:07
झी २४ तास वेब टीम, मुंबई अप्रतिम सादरीकरण, एकाहून एक उत्तम परफॉर्मन्स हे एका पेक्षा एक जोडीचा मामला या शोचं वैशिष्ट्य आहे. नुकताच या शोमध्ये कॉलबॅक राऊंड पार पडला आणि या कॉल बॅक राऊंडमध्ये दोन जोड्यांनी पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री घेतली. त्यामुळे आपल्या या लाडक्या जोड्यांचा डान्स पुन्हा एकदा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
तसंच या शोमध्ये काही सरप्राईजेसही आहेत, आणि ते म्हणजे यापुढे महागुरु आणि प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे एलिमिनेशन होणार आहे. त्यामुळे इतके दिवस मेंटॉर म्हणून जबाबदारी पार पडणारे दिपाली विचारे आणि मयुर वैद्य मंचावर दिसणार नाहीत आणि म्हणूनच मयुरने यावेळी या मंचावर पुन्हा एकदा डान्स करण्याची आपली इच्छाही पूर्ण करुन घेतली.
एकूणच काय तर आता स्पर्धा अंतिम फेरीकडे वाटचाल करतेय. त्यामुळे स्पर्धा दिवसेंदिवस अधिकंच अटीतटीची होताना दिसणार आहे.
First Published: Wednesday, December 14, 2011, 15:07