Last Updated: Thursday, December 15, 2011, 11:51
झी २४ तास वेब टीम, मुंबई ‘डान्स इंडिया डान्स’चा तिसरा सिझन लवकरच आपल्या भेटीला येतोय. तिसऱ्या सिझनच्या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. यावेळी स्पर्धकांनी उत्तम परफॉर्मन्स सादर केले.
अप्रतिम सादरीकरण, स्टंट्स, एरिअल अॅक्ट असे वेगवेगळे डान्सफॉर्म्स डीआयडीच्या दोन सिझनमध्ये पहायला मिळालेत आणि तोच डान्स तडका तिसऱ्या सिझनमध्येही अनुभवायला मिळणार आहे. कारण, डीआयडीच्या तिसऱ्या सिझनच्या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या.
युरोपहून खास डीआयडीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या अँनास्थियाचा डान्स पाहून मेंटॉर टेरेन्स भारावूनच गेला. तर तांडव आणि भरतनाट्यमचं उत्कृष्ट सादरीकरण करुन एका स्पर्धकाने ‘तकदीर की टोपी’ही मिळवलीय.
आता, हे सगळे परफॉर्मन्स पाहून डीआयडीचा तिसरा सिझन नक्कीच रंगतदार होणार हे वेगळं सांगायला नको.
First Published: Thursday, December 15, 2011, 11:51