नट्या अटकेत, करीत होत्या वेश्याव्यवसाय - Marathi News 24taas.com

नट्या अटकेत, करीत होत्या वेश्याव्यवसाय

www.24taas.com, पुणे
 
टिव्हीवर झळकणं, प्रसिद्धी मिळविणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि तरूणींनी तर जास्तच आकर्षण असतं. अशा तरूणीं यासाठी त्या काहीही करण्यास तयार असतात.   चित्रपट व दूरचित्रवाहिनीवरील विविध  मालिकांतील सहकलाकार मुलींना वाममार्गाला लावणा-या दलाल जोडप्यास पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. स्मिता धिवार व तिचा पती दिनेश धिवार यांच्यासह मुंबईतील दोन कलाकार मुलीही ताब्यात घेण्यात आल्या.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यात सेक्स रॅकेट्स मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत. यात काही टीव्ही अभिनेत्री व परदेशी मुलींचाही समावेश आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी जगताप यांना या रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. मुंबई येथे बॉलीवूडमध्ये कास्टिगंचे काम करणारे धिवार जोडपे पुणे व मुंबई या ठिकाणी दूरचित्रवाहिनीत काम करणा-या मुलींमार्फत वेश्याव्यवसाय करत आहे. बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी स्मिता धिवारशी बनावट गि-हाइकाच्या माध्यमातून संपर्क साधला.
 
स्मिताने तिचा पती दिनेश याच्या बॅँक खात्यावर १० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर धिवार जोडप्याने मालिकेत काम करणा-या दोन  मुलींसह पुण्यात मंगळवारी रात्री येण्याचे कबूल केले. मुलींसाठी दोन तासांचे प्रत्येकी ५० हजार रुपये घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार पोलिसांनी शिवाजीनगर भागातील एका हॉटेलवर सापळा रचून दलाल महिला, तिचा पती व दोन मुलींना पिटा कायद्यांतर्गत अटक केली. पोलिसांच्या चौकशीत पंजाबहून आलेल्या मुलीने सांगितले की, मी साडी शो, सलवार कमिजचे शो केले आहते. त्याचबरोबर स्टार प्लस या चॅनलवरील ‘साथीया’ व कलर्स चॅनलवरील ‘ससुराल सिमरन का’ या मालिकांत सहकलाकाराचे काम केले आहे.
 

First Published: Thursday, August 2, 2012, 08:24


comments powered by Disqus