दिल्या घरी सुखी राहा... - Marathi News 24taas.com

दिल्या घरी सुखी राहा...

झी २४ तास वेब टीम
 
झी मराठीच्या दिल्या घरी सुखी राहा या मालिकेत सध्या काय चाललयं पाहूयात, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिकेत आला आहे एक ट्विस्ट. चंदनाच्या अपघाताने लिंबूवाडीत सारेच चिंतेत आहेत. चंदनाचा अपघात झाल्याने काकडे कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे.
 
इतकंच नाही तर चंदनाला आपला पाय गमवाव लागल्यानं ती खूपंच खचून गेली आहे. तर इकडे, चंदनाच्या अपघाताची ही बातमी कळताच कांता चोरगेला काय करावं काहीच सुचत नाहीए. त्यातच चंदनाने पाय गमावल्याने आता प्रसाद आणि चंदनाचं लग्न मोडण्याचा विचार कांताने केला आहे. आणि त्याप्रमाणे तिने डावही खेळला आहे.
 
कांता काकूंचा हा प्लान समजल्याने वृंदा मात्र, गोंधळून गेलीय.. तिचा अजूनही यावर विश्वासच बसत नाहीए.. त्यामुळे आता कांता चोरगे काय पाऊल उचलणार? खरंच चंदना-प्रसादचं लग्न मोडणार का? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

First Published: Tuesday, December 27, 2011, 23:36


comments powered by Disqus