Last Updated: Sunday, January 1, 2012, 21:08
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
मनोरंजन चॅनल 'कलर्स' यावर प्रसारित होणारा रियालिटी शो बिग बॉसच्या पाचव्या पर्वात शनिवारी पॉर्न स्टार सनी लियोन ही बाहेर गेली आहे.
सनीला फायनलच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. बिग बॉसचं म्हणण्यानुसार सनीने जास्त ड्रामेबाजी जमली नाही. बिग बॉसची फायनल पुढच्या आठवड्यात होणार आहे.
सनीला बाहेर काढण्यासाठी घरातील इतर लोकांपैकी अमर उपाध्याय, जूही परमार, मेहक चहल, सिद्धार्थ भारद्वाज आणि आकाशदीप सैगल याचं देखील नाव तिच्यासोबत होतं. पण प्रेक्षकाचा कौल हा सनीच्या विरोधात गेल्याने तिला बाहेर पाडावं लागलं. सनी बिग बॉसच्या घरात नोव्हेंबरमध्ये दाखल झाली होती. आणि तिच्या मादक अदांनी प्रेक्षकांना मात्र चांगलच घायाळ केलं होतं.
First Published: Sunday, January 1, 2012, 21:08