आऊ शक्ती का डान्स, देखने को भूलना नही - Marathi News 24taas.com

आऊ शक्ती का डान्स, देखने को भूलना नही

www.24taas.com वेब टीम, मुंबई 
 
'आऊ मैं आ गया!" असा डायलॉग बिग बॉस 5 च्या फायनलच्या वेळेस शक्ती कपूरने मारला नाही म्हणजे मिळवलं. शक्ती कपूर आणि बिग बॉसमधल्या महिला स्पर्धक स्टेजवर धमाल उडवणार आहेत.
 
शक्तीने शोमध्ये एण्ट्री घेतली तेव्हा सगळ्यांना एकच धक्का बसला होता. कारणही तसंच होतं, १२ स्त्री स्पर्धक, एक तृतियपंथी आणि शक्ती म्हणजे आता काय होणार असं काहूर अनेकांच्या मनात जमा झालं होतं.
 
 सलमान आणि शक्तीमध्ये बोलचाली आता ती खरी होती की, प्रेक्षक खेचण्यासाठीची क्लुप्ती हे देवाला सुध्दा सांगणं कठीण जाईल पण ते जाऊन द्या म्हणा. त्यामुळे शक्तीला ग्रँड फायनलपासून दूर राहण्यास बजावण्यात आलं होतं. पण आता चॅनलच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार शक्ती मनदीप बेवली आणि रागेश्वरी लुंबासोबत 'यम्मा यम्मा' या गाण्यावर खास त्याच्या इश्टाईलमध्ये नाचणार आहे.
 
आयला कोण पण जिंको पण शक्तीचा नाच हेच खरं आकर्षण ठरु शकतं. शक्तीची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी झाल्यानंतर त्याने सलमानबद्दल शेरेबाजी केली होती.  सलमानने आपल्या विषयी अनादर दाखवल्याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी मागणीही शक्तीने केली होती. त्यामुळेच शक्तीचा पत्ता कट झाल्याच्या बातम्या होत्या. पण आता शक्तीची रिएण्ट्री होतं आहे.
बॉस टीआरपी के लिए चॅनेल और ऍक्टर लोग कुछ भी कर सकते है. लहानपणी रस्त्यावर माकडवाला खेळ दाववायचा आणि आपण हरखून टाळ्या वाजवायचो आठवत असेलच तुम्हाला त्याचंच हे चकचकीच पडद्यावरचं रुपडं.  मग फायनलच्या दिवशी माकडा ऐवजी शक्ती नाचला की टाळ्या वाजवायला विसरु नका आणि हो पैसे जर जास्त दिले ना तर शक्ती रस्त्यावर माकडासोबत सुध्दा नाचेल.
 
 

First Published: Thursday, January 5, 2012, 22:48


comments powered by Disqus