अखेर 'बिग बॉस'मध्ये अमर रडला ! - Marathi News 24taas.com

अखेर 'बिग बॉस'मध्ये अमर रडला !

www.24taas.com, मुंबई
 
बिग बॉसच्या घरात 'स्मार्ट प्लेअर’ म्हणून वावरणाऱ्या अमर उपाध्यायचा काल सायंकाळी भावनांचा बांध फुटला. अमर पहिल्या दिवसांपासूनच मनाने खंबीर असलेला स्पर्धक म्हणून वावरत होता. मात्र, आकाशदीप ‘स्काय’ सेहगल यांने अमरला त्याच्य आईबद्दल विचारले आणि त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या....







मनालीमध्ये एका चित्रपटाचे शुटिंग सुरू होते आणि त्यांच्या आईने त्याला फोन केला होता. पण त्यावेळी तो आईशी बोलू शकला नाही, हे अमर घरातील सदस्यांना सांगत होता. नंतर जेव्हा त्याने घरी फोन केला, त्याचवेळी दिग्दर्शकाने पुढच्या शॉटसाठी अमरला हाक दिली आणि अमरचं पुन्हा आईशी बोलणं राहून गेलं. आणि रात्री जो अमरला घरून कॉल आला, तो आईच्या बिघडलेल्या तब्येतीची बातमी सांगायलाच... आईच्या गंभीर प्रकृतीबद्दल कळताच अमर तडक मुंबईला निघून आला. पण, तोपर्यंत उशीर झाला होता. अमरची आई जग सोडून निघून गेली होती.
 
अमरसारखा धुर्त खेळाडू बिग बॉसमध्ये कधी भावनाविवश होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण आईचा विषय निघाल्यावर मात्र अमर अश्रू रोखू शकला नाही.
 
 

First Published: Saturday, January 7, 2012, 15:07


comments powered by Disqus