विजेती होणार माहीत होते जुहीला! - Marathi News 24taas.com

विजेती होणार माहीत होते जुहीला!

www.24taas.com, मुंबई
बिग बॉसमधील घरातल्यांसह स्वतः जुहीला ती बिग बॉस सिझन-५ ची विजेती होणार असल्याचे वाटत होते, असे स्वतःबिग बॉस सिझन-५ ची विजेती जुही परमारने म्हटले आहे.
 
टीव्ही मालिका कुमकुम द्वारे भारतातल्या घराघरात फेमस झालेल्या जुहीने विजयानंतर म्हटले की, हा खिताब म्हणजे छोट्या पडद्यावर दुसरी इनिंग सुरू केल्या सारखा आहे. या विजयाने माझ्या आत्मविश्वासात भर पडली आहे. तसेच टीव्हीतील करिअरने एक नवीन पातळी गाठली आहे. महक या शोची विजेता बनली असती तर या शोबाबत लोकांना संशय निर्माण झाला असता तसेच अविश्वासही वाढला असता.
 
महक जास्त लोकांना आवडत होती. परंतु, तीला पुन्हा घरात स्थान दिल्याने लोकांना आवडले नाही. सलमान खान आणि संजय दत्त यांनी माझ्या नावाची घोषणा करण्यापूर्वी घरातील लोकांनी मी विजेती होणार हे सांगून टाकले होते. तसेच माझ्या नावाला समर्थन दिले होते. महकशी माझे वैर नाही, परंतु तिचे परत येणे हे फक्त फायनलसाठी होते, हे आपल्याला मान्य करावे लागले.

First Published: Monday, January 9, 2012, 15:17


comments powered by Disqus