केबीसी-५ मध्ये 'राम' आणि 'प्रिया' - Marathi News 24taas.com

केबीसी-५ मध्ये 'राम' आणि 'प्रिया'

झी २४ तास वेब टीम, मुंबई
सोनीवर सध्या गाजत असलेल्या ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील लीड पेअर ‘राम कपूर’ आणि ‘साक्षी तन्वर’ यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आपल्या बुध्दीमत्तेची झलक दाखवली. या जोडीने २५ लाख रुपये जिंकल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राम कपूरने पहिल्यांदाच या शोमध्ये हजेरी लावली होती. तर साक्षीने याआधीही दोनदा हॉटसीटचा अनुभव घेतला आहे. साक्षीने पहिल्या वेळेस ‘श्वेता क्वत्रा’ तर दुसऱ्या वेळेस ‘स्मृती इराणी’ आपली पार्टनर होती असं आठवणींना उजाळा देताना सांगितलं. याआधीच्या वेळेस आमच्यात झालेले संभाषण बच्चन यांना पूर्णपणे आठवत असल्याचं पाहून ती थक्क झाली. ‘बडे अच्छे...’ च्या शूटमध्ये व्यस्त असल्याने आपल्याला तयारीला फार थोडा वेळ मिळाल्याचं सांगितलं.पण,अमिताभ बच्चन यांनी खूप मदत केली असं ही साक्षी पुढे म्हणाली. बच्चन यांनी आम्हाला चान्स घ्यायला सांगितले आणि आम्ही जिंकलो. या महिन्याच्या अखेरीस हा एपिसोड प्रेक्षकांना पाहता येईल.

First Published: Thursday, October 20, 2011, 17:02


comments powered by Disqus