मानवरहित पवित्रा रिश्ता? - Marathi News 24taas.com

मानवरहित पवित्रा रिश्ता?

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
झीची टॉप सिरियल पवित्रा रिश्ता नोव्हेंबर महिन्यात एकदम अठरा वर्षांनी पुढे सरकणार आहे. अर्चना साकारणारी अंकिता लोखंडे कायम राहणार असली तरी तिच्या नवऱयाची मानवची भूमिका साकारणारा सुशांत सिंग राजपूत ‘पवित्र रिश्ता’ शी नातं तोडणार आहे. सुशांत बऱेच दिवस फिल्म मेकिंगचा कोर्स करण्यासाठी न्यु यॉर्कला जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत पण ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्याने तिच्या एपिसोडसचा सिलसिला कायम राहिला.
 
आता सुशांतने ‘पवित्र रिश्ता’ला  रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या जागी दुसऱ्या कलाकाराची वर्णी लागेल अशी कुजबुज आहे. त्यासाठीच निर्माती एकता कपूर कलाकाराच्या शोधात आहे. मानवच्या जागी नवा कलाकार घ्यायाचा की नवी व्यक्तिरेखा जन्माला घालायची याबद्दल विचार चालु असल्याचं कळतं. नवी व्यक्तीरेखेचा निर्णय झाला तर अंकिताला विधवेची भूमिका साकारयला लागेल. या सगळ्या घडामोडींमध्ये अंकिता नाराज असल्याचेही कळतं. त्यामुळेच आता तिने अडवणुकीचे धोरण स्वीकारलं आहे आणि नव्या अटी घालायला सुरवात केली आहे.

First Published: Friday, October 21, 2011, 14:33


comments powered by Disqus