आता मालिकेचाही प्रीमिअर सोहळा - Marathi News 24taas.com

आता मालिकेचाही प्रीमिअर सोहळा

www.24taas.com,मुंबई
 
आजवर आपण अनेक सिनेमांचे प्रीमिअर पाहिल्येत. मात्र पहिल्यांदाच एका मराठी मालिकेचा प्रीमिअर पार पडला...एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेचा प्रीमिअर मुंबईत नुकताच पार पडला या प्रीमिअरला मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती.
 
आपल्या पहिल्याच एपिसोडला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे याचि देही याची डोळा अनुभवायची संधी एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेच्या टीमला मिळाली...स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, मोहन जोशी यांसारख्या दिग्गजांची प्रमुख भूमिका असलेली एक लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका नुकतीच झी मराठी वाहिनीवर सुरू झाली आणि या मालिकेचा प्रीमिअरही त्याचवेळी पार पडला...त्यामुळे या मालिकेच्या पहिल्याच भागाचा प्रतिसाद कलावंतांना प्रीमिअरलाच मिळाला...
 
या प्रीमिअरला या मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती...त्यामुळे कोणाचा काम आवडलं आणि कोणाचं नाही हे देखिल दिग्दर्शकापासून प्रत्येक कलावंताला उमगलं...त्यामुळे पहिल्याच भागात प्रत्येकाला आपल्या प्लस आणि मायनस पॉईंटही कळले त्यामुळे आता या मालिकेची टीम उत्तरोत्तर प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेल हे नक्की.....
 

 
 

First Published: Tuesday, January 17, 2012, 23:54


comments powered by Disqus