Last Updated: Wednesday, January 25, 2012, 15:24
www.24taas.com 
एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिका चांगलीच गाजते आहे. तर पाहूया या मालिकेत नक्की काय घडतेय ते घनश्यामच्या लग्नाचा घरच्यांनी चंगच बांधला आहे आणि आता त्यातच मालिकेतली हिरोईन म्हणजेच राधाची पत्रिका घनश्यामच्या आईच्या हाती लागली आहे.
आता राधाचा फोटो घनश्याम जवळच मिळाल्यामुळे घमश्यान पेचात सापडला आहे. तर दुसरीकडे राधालाही मुलगा बघण्यासाठी तिचे वडील प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. आणि अखेर बघण्याच्या कार्यक्रमासाठी राधा-घनश्यामला मनवण्यात दोन्ही घरची मडळी यशस्वी होतात.
आता ह्या एका लग्नाची दुसरी गोष्ट कशी असणार हे पाहणं देखील मजेशीर ठरणार आहे मात्र जेव्हा राधा-घनश्याम समोरासमोर येणार तेव्हा काय होणार ह्यात खरी गंमत आहे.... तर वेट अँण्ड वॉच...
First Published: Wednesday, January 25, 2012, 15:24