Last Updated: Thursday, October 27, 2011, 07:50
झी २४ तास वेब टीम, मुंबईसध्या सोनी टीव्ही वर गाजत असलेल्या अदालत मालिकेतील के. डी. पाठक म्हणजेच अभिनेता रोनित रॉय याच्यावरच आता कार अपघात प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. आणि या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
अभिनेता रोनित रॉयच्या भरधाव कारनं तिघांना जोरदार धडक दिली आहे. मुंबईच्या अंधेरी उपनगरात ही घटना घडली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झालेत. यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जखमींना कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याच अपघातप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रोनिल रॉयला अटक करण्यात आलंय.
यापुर्वी अभिनेता सलमान खानच्या भरधाव वेगात जाणाऱ्या गाडीने बँड्रा येथील फुटपाथवर झोपलेल्या काही लोकांना चिरडले होते.
First Published: Thursday, October 27, 2011, 07:50