Last Updated: Thursday, February 9, 2012, 17:34
www.24taas.com, मुंबई 
डान्स इंडिया डान्स या रियालिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी मुंबईत आलेल्या १३ वर्षाचा अम्बुज हा उत्तरप्रदेशातील मुलगा मुंबईत हरवला आहे.
१३ वर्षांच्या अम्बुजचे नातेवाईक आपल्या मुलाला शोधण्यासाठी मुंबईत वणवण फिरत आहेत. उत्तरप्रेदशातल्या प्रतापगड या भागात रहाणारा अम्बुज डिसेंबर २०११ पासून हरवला आहे. आणि आता नातेवाईक त्याला शोधण्यासाठी त्याचा फोटो घेऊन मुंबई पालथी घालत आहेत.
जागोजागी पोस्टर्स लावत आहेत, याला कुणी पाहीलं आहे का विचारत फिरत आहेत. अम्बुजला सध्या सुरू असलेल्या डान्स इंडिया डान्स या रिऍलिटी शोमध्ये भाग घ्यायचा होता असं त्याच्या मित्रांकडून कळल्यावर त्याचे नातेवाईक मुंबईत आले आणि त्यांनी कुर्ला पोलीस स्थानकात त्याच्या हरवल्याची नोंद केली आहे.
First Published: Thursday, February 9, 2012, 17:34