Last Updated: Thursday, November 3, 2011, 11:25
झी २४ तास वेब टीम, मुंबईलिटील चॅम्प आर्या आंबेकरच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा अनुभवयाला मिळणार आहे. आर्याने नुकतंच एका मालिकेच्या शीर्षकगीताला स्वरसाज चढवला आहे. सारेगमप लिटील चॅम्प्समधून घराघरात पोहोचलेली प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर आपल्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा प्रेक्षकांवर घालायला सज्ज झाली आहे. कारण, आता आर्या झालीय पार्श्वगायिका. स्टार प्रवाहवर येत असलेल्या 'सुवासिनी' या नव्या मालिकेचं मालिकेचं शीर्षक गीत गाण्याची संधी आर्याला मिळाली. आर्यासाठी मालिकेचं शीर्षक गीत गाण्याचा अनुभव खूपच खास होता. यातून खूप काही शिकायला मिळाल्याचंही आर्याने म्हटलं.
First Published: Thursday, November 3, 2011, 11:25