डान्स इंडिया डान्समध्ये 'मंगळागौर' - Marathi News 24taas.com

डान्स इंडिया डान्समध्ये 'मंगळागौर'

www.24taas.com, मुंबई
 
डान्स इंडिया डान्समध्ये या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार आहे एक सरप्राईज. डीआयडीच्या सेटवर आजवर आपण अनेक डान्सफॉर्म्स पाहिले असतील. मग कधी तो वेस्टर्न असो, कण्टेम्परी असो किंवा अगदी बॉलिवूड स्टाईल असो.
 
वेगवेगळ्या थीम्सवरही या मंचावर डान्स करण्यात आले आहेत. मात्र, आजवर कधी मंगळागौर या मंचावर सादर झालेली आठवतेय का? आश्चर्य वाटलं ना. पण या आठवड्यात प्रेक्षकांना हेच सरप्राईज मिळणार आहे. प्रेक्षकांना आणि मेण्टॉर्सना हे सरप्राईज दिलं मिथुन दा यांनी.
 
यावेळी मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ डीआयडीच्या मंचावर सादर करण्यात आले. त्यामुळे आता मराठमोळी मंगळागौर ही डीआयडीच्या मंचावर नवनवे खेळ सादर करून महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करेल.
 
 
 

First Published: Tuesday, February 21, 2012, 17:12


comments powered by Disqus