'झी मराठी सारेगमप' येतायेत दोन विनोदवीर - Marathi News 24taas.com

'झी मराठी सारेगमप' येतायेत दोन विनोदवीर

Tag:  
www.24taas.com,
 
सारेगमपच्या मंचावर सप्तसुरांची बरसात होते आहे. सारेगमप मंचावर सेलिब्रिटींच्या मनातलं गाणं प्रेक्षकांना घरबसल्या ऐकायला मिळतं आहे. नुकतचं या मंचावर स्ट्रगल ही थीम पार पडली. यावेळी स्पर्धकांनी आपल्या आयुष्यातील अनेक स्ट्रगलचे किस्से सांगितले आणि बहारदार सादरीकऱण करत सगळ्यांचीच मनं जिंकली.
 
मात्र यात कमी पडला तो अभिजीत केळकर. त्यामुळे त्याला या मंचावरून निरोप देण्यात आला. अभिजीतने जरी या मंचावरून एक्झिट घेतली असली तरी आता आणखी दोन सेलिब्रिटी या मंचावर एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि हे दोन नवे सेलिब्रिटी आहेत पॅडी आणि जितेंद्र जोशी.
 
मात्र या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना ऑडिशन द्यावी लागणार आहे आणि या ऑडिशनमध्ये पास झाल्यावरच त्यांना या स्पर्धेत सहभागी होता होणार आहे. जर हे दोन विनोदवीर या स्पर्धेत सहभागी झाले तर  सारेगमपची रंगत अधिकच वाढणार हे नक्की.
 
 
 
 
 

First Published: Friday, March 2, 2012, 11:56


comments powered by Disqus