Last Updated: Monday, March 5, 2012, 23:11
www.24taas.com 
एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये सध्या घनश्याम आणि राधाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. तर दुसरीकडे घना आणि राधा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. घनश्याम आणि राधा यांचं प्रेम हळुहळु फुलायला लागलं आहे.
दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच राधाला ऑफिसच्या कामानिमित्त नाशिकला जावं लागणार आहे. आणि त्यात राधाची मदत करण्याचं वचन घनश्याम राधाला देतो. आणि अगदी सिनेमात घडावं तसंच घडतं घना आणि राधाच्या लव्हस्टोरीत. घनश्याम राधाचा ड्रायव्हर बनून देसाईंच्या घरी येतो. मात्र, घनाला पाहून राधासुद्धा आश्चर्यचकीत होते.
मात्र, अगदी अपेक्षेप्रमाणे घनश्यामची गाडी रस्त्यात बंद पडते.. आणि मग घडतं वेगळच नाट्य. अखेर दरमजल करत घना आणि राधाचा नाशिकचा प्रवास होतो. हळुहळु गोष्टींनी उलगडणारं घना आणि राधाचं प्रेम यापुढे कोणत्या वळणावर येणार याचीच वाट पाहुया.
First Published: Monday, March 5, 2012, 23:11