सिनेमाचे नव्हे मालिकेचे बजेट १०० कोटी रुपये - Marathi News 24taas.com

सिनेमाचे नव्हे मालिकेचे बजेट १०० कोटी रुपये

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
अनिल कपूरचा  चॉकलेट तुम्हाला आठवतोय का ? तोडांत चिरूट धरलेल्या ओव्हरकॉनफिडंट वकिलीच्या  स्टायलीश भूमिका त्याने अशी काही वठवली होती की यंव रे यंव... या सिनेमात  तो वकिलापेक्षा डिटेक्टटिव्हच जास्त आहे असं  त्याची भूमिका पाहताना वारंवार जाणवत राहतं. आता हे सारं आठवण्याचं कारण अनिल कपूरने नुकतेच ट्वेंटिएथ  सेच्यूरी फॉक्सबरोबर 24 ही मालिका करण्यासाठी करार केला.  जगभरातील मालिकांमध्ये हेरगिरीच्या कथानकावर आधारीत सर्वाधिक काळ चाललेली ही  मालिका आहे. अनिल कपूर आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये झालेला करार आहे तब्बल १०० कोटी रुपयांचा आहे. ट्वेंटिएथ सेंच्यूरी फॉक्सची ही सर्वात जास्त नफा कमावणारी मालिका असून अमेरिकेबाहेर पहिल्यांदाच या मालिकेची निर्मिती करण्यात येत आहे.
 
अनिल कपूर यात लीड रोल करणार असून पहिल्या सीझनमध्ये २४ भाग प्रसारीत करण्यात येणार आहे. हॉलिवूडच्या प्रॉडक्शन हाऊसेसनी आता भारतावर लक्ष केंद्रीत केलं आहे. कारण टेलिव्हिजनची बाजारपेठ दरवर्षी १४.५ टक्क्यांनी विस्तारेल असा अंदाज आहे. आणि २०१५ मध्ये ६०,२५०  कोटी रुपयांची उलाढाल होणं अपेक्षित आहे. यंदाच्या वर्षात उलाढाल ३०,६५० कोटी रुपये इतकी होईल. भारतीय प्रेक्षक वर्गाला आकृष्ट करण्यासाठी हॉलिवूडच्या निर्मितीत भारतीय कलाकारांना अधिक वाव देण्यात येत आहे.
 

अमेरिकेत नोव्हेंबर २००१ मध्ये या मालिकेचे प्रसारण सुरु झालं आणि त्याची अखेर २४ मे २०१० रोजी झाली.या दरम्यान १९२ भाग प्रसारीत करण्यात आले.  आता हिंदीत या मालिकेची निर्मिती अनिल कपूरचे प्रॉडक्शन हाऊस करणार आहे आणि सध्या त्याच्या प्रसारणाचे हक्क विकण्यासाठी तीन चॅनेल्स बरोबर बोलणी सुरु आहेत. फॉक्सने हिंदीत भाषेतील कथानकासाठी पहिल्यांदाच स्वातंत्र्य  दिलं आहे.

First Published: Wednesday, November 9, 2011, 11:38


comments powered by Disqus