पुढचं पाऊलमध्ये कल्याणीने केलंय तरी काय? - Marathi News 24taas.com

पुढचं पाऊलमध्ये कल्याणीने केलंय तरी काय?

www.24taas.com
 
पुढचं पाऊल या मालिकेतल्या घडामोडींना आता वेग आला आहे. गेले कित्येक दिवस कल्याणी करत असलेल्या नाटकावर अखेर पडदा पडला आहे. नक्की काय घडलं आहे  सरदेशमुखांच्या घरात हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.
 
घरच्यांनी हाकलून द्यावं यासाठी कल्याणी गेले कित्येक दिवस नाटक करीत आहे. मात्र, अखेर या नाटकावर पडदा पडतो. या नाटकामागचा खरा सूत्रधार सर्वांसमोर येतो. कांचनमाला आणि चिंतामणीला पाहून सरदेशमुखांच्या घरातल्यांना धक्काच बसतो. इतकंच नाही तर आक्कासाहेब कांचनमाला आणि चिंतामणीच्या चेहऱ्याला काळं फासतात आणि अद्दलही घडवतात.
 
आणि अशाप्रकारे पुन्हा एकदा सरदेशमुखांच्या घरात आनंदाचे दिवस आले आहेत. मात्र, मालिकेत ट्विस्ट अँन्ड टर्न्स आले नाहीत तर ती मालिका कसली. तेव्हा यापुढे सरदेशमुखांच्या घरात काय नाट्य घडणार याचीच वाट पाहुया.
 
 
 

First Published: Monday, March 12, 2012, 20:47


comments powered by Disqus