किसिंग बडा अच्छा लगता है.... - Marathi News 24taas.com

किसिंग बडा अच्छा लगता है....

www.24taas.com, मुंबई

छोट्या पडद्यावरील मालिकांमधले चित्रण बहुतांश कुटुंबातील सर्वजण एकत्रपणे पाहू शकतील अशा स्वरुपाचे असते. पण सोमवारी रात्री एकता कपूर आणि तिच्या टीमने छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांना 440 वोल्टचा झटका दिला. एकताच्या बडे अच्छ लगते है मध्ये भारतीय मालिकांमध्ये आजवर कधीही पाहायला मिळाला नव्हता असा किंसिंग सीन दाखवण्यात आला. सोमवारी प्रसारीत झालेल्या भागात तब्बल 17 मिनिटांच्या गरमागरम सीनमध्ये किसिंग सीनचाही समावेश होता आणि ते पाहताना प्रेक्षकांना अवघडल्या सारखं वाटणं स्वाभाविकच म्हणावं लागेल.
 
बडे अच्छ लगते है मध्ये राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी विवाहीत जोडप्याची भूमिका साकारली आहे आणि लग्नानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. या भागात चाळीशीचा कपूर आणि तिशीची साक्षी शरीराने एकरुप होताना दाखवलं आहे. हा एपिसोड एअरवर गेल्यानंतर साक्षी तन्वर आणि राम कपूर यादोघांनी ट्विटरवर ट्विट केलं आणि त्यात रामच्या वजनदार व्यक्तीमत्वाविषयी जोकची चर्चा प्रामुख्याने होती.
 
टीव्हीवरील मालिकेच्या बाबतीत सोशल नेटवर्किंग साईट अपवादाने एवढी चर्चा रंगते पण चुंबन दृष्याने एकच हलचल माजवली आणि आता भारतीय टेलिव्हिजनने कात टाकली आहे का? असा प्रश्न पडला नाही तरच नवल.
 

First Published: Tuesday, March 13, 2012, 18:25


comments powered by Disqus