वा क्या बात है!!! रेखा आणि माधुरी एकत्र - Marathi News 24taas.com

वा क्या बात है!!! रेखा आणि माधुरी एकत्र

www.24taas.com
 
डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित आणि रेखा यांची 'झलक' लवकरच आपल्याला स्मॉल स्क्रीनवर दिसणार आहे. झलक दिखला जा या रिऍलिटी शोमधून माधुरी दीक्षितची झलक स्मॉल स्क्रीनवर दिसली. या शोच्या निमित्ताने 'बॉलिवूडचं हास्य' रसिकांना पुन्हा एकदा मोहवून गेलं. या शोमध्ये माधुरीचा डान्स जलवाही दिसला. माधुरीचा हा अंदाज पाहून प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य आलं आणि ते म्हणजे वा.. क्या बात है !!!!
 
आणि आपली अशीच मोहिनी घालण्यासाठी माधुरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. कारण या शोचं नवं पर्व लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि विशेष म्हणजे यावेळी या शोचं परीक्षण करताना माधुरी दीक्षितला रेखा यांचीदेखिल साथ मिळणार आहे कारण या नव्या शोचं परीक्षण कऱण्यासाठी रेखाला देखिल अप्रोच करण्यात आलं आहे.
 
रेखा आणि माधुरी म्हणजे दि ब्युटी ऑफ इंडियन सिनेमा, या दोघींना एकाच मंचावर एकत्र पाहणं म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. नृत्याची उत्तम जाण रेखा यांना देखिल आहे. आजवर रेखा यांचा एव्हरग्रीन अंदाज आपण फक्त बिग स्क्रीनवरच पाहिला होता मात्र आता पहिल्यांदाच रेखा स्मॉल स्क्रीनवर अवतरणार आहे.
 
आणि तेही परीक्षकांच्या रुपात. त्यामुळे स्पर्धकांसाठी ही एक अविस्मरणीय स्पर्धाच असेल. या शोसाठी या दोघींना किती मानधन दिलं आहे या बद्दल न बोललेलच बरं कारण हा आकडा कोट्यावधी रुपयांच्या घरात जातो आहे. रेखाला तर या आधीही अनेक रिऍलिटी शोच्या ऑफर आल्या होत्या मात्र त्या सगळ्या ऑफर्स तिने नाकारल्या होत्या. मात्र पहिल्यांदाच रेखाचीही झलक स्मॉल स्क्रीनवर दिसणार आहे. एकूणच  बॉलिवूडच्या या दोन सौंदर्यसम्राज्ञीच्या उपस्थितीमुळे या शोला चारचाँद लागणार आहेत.
 
 

First Published: Monday, March 19, 2012, 12:24


comments powered by Disqus