Last Updated: Friday, April 6, 2012, 19:14
www.24taas.com, मुंबईप्रेक्षकांना डान्सचा डबल धमाका अनुभवायला मिळतो तो डीआयडीच्या मंचावर… यावेळी हे स्पर्धकांनीही कमाल केली आहेत.
सळसळता उत्साह, जिंकण्याची जिद्द आणि डान्सिंग पॅशन हे सारं काही प्रत्येक स्पर्धकाच्या नृत्यामधून प्रतिबिंबीत होत असतं आणि असाच डान्सिंग जलवा यावेळी देखिल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे...यावेळी प्रदीपने हटके डान्स सादर करून रेमोची दाद मिळवली तसंच त्याच्यासह तालही धरला...
तर राघवचा हा स्लोमोशन डान्स प्रत्येकाला भावला...यावेळी राघवच्या वडिलांनी आणि भावाने या मंचावर सरप्राईज एन्ट्री घेतली. आणि या तिघांनी मिळून स्लोमोशन डान्सची झलक दाखवली.
तसंच या सगळ्यांना टफ फाईट देण्यासाठी मोहेनाही सज्ज आहे, मोहेनाच्या डान्सवर मिथुनदा खूष झालेत. एकूणच प्रत्येक धुनवर डीआयडीचे स्पर्धक असे बेधुंद झालेत...
First Published: Friday, April 6, 2012, 19:14