Last Updated: Sunday, April 15, 2012, 18:39
www.24taas.com

एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत आता घना-राधामध्ये बरंच काही घडत आहे. नाही नाही म्हणता राधा काळे कुटुंबात रमलीही. त्यामुळेच राधाची माई आजीसह छान गप्पांची मैफिल रंगते. यावेळी माईआजी घनाचे लहानपणीचे किस्से राधाला सांगतात.
आणि याचवेळी राधा माईआजींसह एक डीलही करते. राधाचा घनाबरोबरचा हा संसार फक्त सहा महिन्यांसाठीच असला तरी या लग्नामुळे राधाला घरातल्यांची कामं करावी लागतात आणि यांचचं घनाला वाईट वाटतं. मात्र यामागच्या आपल्या भावना राधा घनाला स्पष्ट करते.
घना-राधाच्या या इमोशनल ड्रामामध्ये आता रोमान्सही फुलताना आपल्याला दिसणार आहे. एकूणच प्रेमाचं हे खोटं नाटक करता करता घना-राधा खरंच एकमेकांच्या प्रेमात तर पडणार नाहीत ना? कारण खरंच घ्याचं वेगळं आहे आणि घ्यांचा काही नेम नाही.
First Published: Sunday, April 15, 2012, 18:39