बिग बॉसच्या घरात पॉर्न स्टारने लपवली ओळख - Marathi News 24taas.com

बिग बॉसच्या घरात पॉर्न स्टारने लपवली ओळख

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
 
बिग बॉसच्या सीजन- ५ मध्ये नुकतीच एंट्री झालेल्या पॉर्न स्टार सनी लियोनचा एक नवाच मामला समोर आला आहे. लियोनने बिग बॉसच्या सगळ्या घरातील लोकांपासून पॉर्न स्टार असल्याचे लपवून ठेवले होते. बॉलीवूडच्या अभिनेता सलमान खानला या शोमध्ये लियोन खोटं बोलल्याचे आढळले.
बिग बॉसच्या घरात जोरदार एंट्री केलेल्या सनी लियोनने हिंदी गाण्यावर चागंल्याच अदा दाखविल्या. तिला जेव्हा घरातील लोकांनी तिच्या कामाबद्दल विचारलं असता ती एक मॉडेल असल्याचे तिने सांगितले होते. पण सनीने घरातील लोकांना हे सांगितले नव्हते की, ती एक पॉर्न स्टार आहे म्हणून.
 
बिग बॉसच्या घरातील पूजाने जेव्हा तिला विचारलं की ती नक्की काय काम करते तेव्हा मात्र तिने त्यात टाळाटाळ करण्यास सुरवात केली, पण नंतर स्वत:ला सावरत सांगितलं की ती विदेशात काही टिव्ही शोसाठी काम करते. यामध्ये असं दिसून येतं की सनी आपली खरी ओळख सगळ्यापासून लपवून ठेवते आहे, आणि खूप चांगली तयारी करून ती या खेळात उतरली आहे. आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार याची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
 

First Published: Wednesday, November 23, 2011, 17:17


comments powered by Disqus