सुशील कुमार द रिअल बिग बॉस - Marathi News 24taas.com

सुशील कुमार द रिअल बिग बॉस

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक सुशील कुमराने रिअल्टी शो बिग बॉसची ऑफर नाकारली आहे. एण्डेमोल इंडियाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली पण मी नकार दिला असं सुशील म्हणाला. इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा मला माझी प्रतिमा महत्वाची आहे आणि तिला तडा जाईल असं काहीही मला करायचं नाही असं सुशीलने सांगितलं. युथ आयकॉन म्हणून असलेली माझी प्रतिमा मला जपायची आहे त्यामुळे मी ऑफरला नकार दिला असं सुशीलकुमारचे म्हणणं आहे.
 
कलर चॅनेलवर बिग बॉसची निर्मिती एण्डेमोल इंडिया ही कंपनी करते. बिग बॉस ही अत्यंत लोकप्रिय असा रिअल्टी शो आहे त्या जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रिटी १४ आठवडे एका घरात एकत्र राहतात. नरेगाचा ब्रँड ऍम्बासॅडर म्हणून खूष आहे. सामान्य लोकांसाठी काम करणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे असं तो म्हणाला. कौन बनेगा करोडपतीमध्ये पाच कोटी रुपये जिंकण्या अगोदर सुशील कुमार बिहार मधल्या पूर्व चंपारण्य जिल्ह्यातील आपल्या गावी नरेगामध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करायचा.

First Published: Thursday, November 24, 2011, 17:09


comments powered by Disqus