Last Updated: Friday, April 27, 2012, 14:00
www.24taas.com 
एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. इतके दिवसा तात्पुरता संसाराच्या गप्पा मारणारा घनाश्याम अमेरिकेला जाण्याचा विचार करतो आहे.
मात्र त्याच्या या विचाराने काळेंच्या घरातलं वातावरण काहीसं गंभीर झालं आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट आता काहीशी गंभीर झाली आहे. घनश्यामनं आई बाबांनी आपल्या अमेरिकेला जाण्याविषयी सांगताच वातावरण काहीसं गंभीर झालं आहे.
मुळात लग्नानंतर घनश्यामनं हा निर्णय घेणंच त्यांना पटलेलं नाही. त्यामुळे आता आई बाबा घनश्यामच्या मिशन अमेरिकावर काय निर्णय घेणार आहे हेच पहायाचं आहे. इथे राधाच्या पपांनाही ही गोष्ट मानवकडून सजमल्यावर तेही चिंतातूर होतात. या सगळ्यामुळे घनश्याम - राधाही गोंधळून गेले आहेत. तर घनाच मिशन अमेरिका यशस्वी होणार का?
First Published: Friday, April 27, 2012, 14:00