Last Updated: Wednesday, May 2, 2012, 15:53
www.24taas.com 
एका लग्नाची दुसरी गोष्ट आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. घनश्यामच्या अमेरिकेला जाण्याच्या निर्णयानं देवकी अस्वस्थ आहे. त्यातच घनश्याम आणि राधाच्या नात्याबद्दल तिच्या मनात प्रश्न उपस्थित होतात. आणि याचाच जाब ती राधाला विचारते.
राधा आणि घनश्यामचं खरं नातं नक्की काय आहे हे कोडं देवकीला अजून उलगडलेलं नाही. घनाचा अमेरिकेला जाण्याचा निर्णय राधा बदलू शकते अशी गळ देवकी राधाला घालते. मात्र यावर राधाचं उत्तर ऐकून देवकीला धक्का बसतो.
इथे ज्ञानाच्या तत्वज्ञानाचा डोस उल्काला लागू पडतो. आणि चक्क उल्का आत्या पुन्हा एकदा लग्न करण्याचा विचार करु लागते. म्हणजे घनश्याम राधाच्या गोष्टीतून थोडीशी उसंत मिळत उल्का आत्याच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट लवकरच आपल्याला पहायला मिळणार आहे.
First Published: Wednesday, May 2, 2012, 15:53