पुन्हा दिसणार माधुरीची 'झलक' - Marathi News 24taas.com

पुन्हा दिसणार माधुरीची 'झलक'

www.24taas.com, मुंबई
 
‘झलक दिखला जा’चं पाचवं पर्व लवकरच सुरू होणार आहे आणि या पर्वातही परीक्षक म्हणून डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित आपली जादू दाखवणार आहे. ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये या आधीच्या सीझनमध्येही माधुरीने आपल्या डान्सची अनोखी झलक दाखवली. रेमो मलायकासह माधुरीनेही आपला डान्स जलवा दाखवला.
 
माधुरीची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असायचे. माधुरी समोर असली की आजूबाजूला कुठेच त्यांचं लक्ष जायचं नाही आणि माधुरीनेही आपल्या फॅन्सला कधी नाराज केलं नाही. माधुरीसह या स्पर्धेतील स्पर्धकांनीही आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना खूष केलं. ‘झलक दिखला जा’चं चौथं पर्व तर हिट ठरलं त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती पाचव्या पर्वाची...मात्र आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपणारेय कारण माधुरी लवकरच झलकचं पाचवं पर्व घेऊन येतेय आणि तेही आपल्या खास स्टाईलमधून...
 
‘झलक दिखला जा’च्या चौथ्या पर्वाच्यावेळी माधुरी अमेरिकेहून खास भारतात आली होती मात्र आता माधुरी मुंबईतच स्थायिक झालीय..त्यामुळे माधुरीच्या कमबॅकचीही उत्सुकता होतीच...आणि अपेक्षेप्रमाणे माधुरी पुन्हा स्मॉल स्क्रीनवर आपली झलक दाखवण्यासाठी पुन्हा सज्ज झालीय. या स्पर्धेत स्पर्धक कोण असणार हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे मात्र या शो च्या निमित्ताने माधुरीची पहिली 'झलक' तिच्या फॅन्सला पाहायला मिळालीय हेही नसे थोडके.....

First Published: Friday, May 4, 2012, 16:54


comments powered by Disqus