'एका लग्नाची दुसरी गोष्ट' रूसवे फुगवे? - Marathi News 24taas.com

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' रूसवे फुगवे?

www.24taas.com
 
'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ही मालिका आता चांगलीच रंगू लागली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार आहे याची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली असणार.
 
आता  कुहू आणि प्रभातमध्ये भांडण झाल्यामुळे कुहू निराश झाली आहे. त्यामुळे तिची चिडचिड होते आणि ती सगळा राग परीवर काढते. इतकच नाही तर आपल्या कवितांवरही कुहू राग काढते. परी झालेला सगळा प्रकार घरच्यांना सांगते. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. कुहूचं असं वागणं कोणालच पटत नाही. त्यामुळे सगळेजण मिळून तिला समजवण्याचा प्रयत्न करतात.
 
मात्र कुहू कोणालाच दाद देत नाही. अखेर कुहू राधाकडे आपलं मन मोकळं करते. राधाला कुहू खरं कारण सांगते. एकूणच आता कुहू आणि प्रभातच्या नात्यात दुरावा येणार की? राधा कुहूला समजवण्यामध्ये यशस्वी ठरणार हे लवकरच कळेल.
 
 
 
 

First Published: Sunday, May 6, 2012, 18:42


comments powered by Disqus