मोनाच्या अश्लील `एमएमएस`चं सत्य अखेर बाहेर, the truth of mona singh mms

मोनाच्या अश्लील `एमएमएस`चं सत्य अखेर बाहेर

मोनाच्या अश्लील `एमएमएस`चं सत्य अखेर बाहेर
www.24taas.com, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री मोना सिंह हिच्या अश्लील एमएमएसचं सत्य अखेर बाहेर आलंय.

खुद्द मोनाही या अश्लील एमएमएसमुळे वैतागली होती. या एमएमएसमध्ये मोनासारखी दिसणारी एक तरुणी अश्लिल हावभाव करताना दिसतेय. या विरुद्ध मोनानं सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर केल्या गेलेल्या चौकशीत या व्हिडिओचं सत्य बाहेर आलंय. डिजीटल एक्सपर्टसनं या व्हिडिओमध्ये दिसत असलेली तरुणी मोना सिंह नाही. तर दुसऱ्याचं तरुणीच्या चेहऱ्यावर मोनाचा चेहरा काही एडीटींग करून चिपकवण्यात आल्याचं म्हटलंय.

वरिष्ठ क्राईम ब्रान्चच्या अधिकाऱ्यांनीदेखील एमएमएसमध्ये छेडछाड करून हा व्हिडिओ बनवण्यास आल्याचं म्हटलंय. छोट्या पडद्यावर झळकलेल्या ‘जस्सी जैसी कोई नही’ या कार्यक्रमातून लोकांसमोर आलेली ३२ वर्षीय अभिनेत्री मोना सध्या ‘क्या हुआ तेरा वादा’ या कार्यक्रमात दिसतेय.

मोनाच्या जवळच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मोना सिंह हिनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. ते बिघडवण्यासाठी हा एमएमएस बनवण्यात आलाय. या व्हिडिओला इंटरनेटवर अपलोड करणाऱ्याला शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दोषीवर आयटी अॅक्ट २००० तसंच आयपीसी १८६० नुसार गुन्हे लावण्यात येतील.

First Published: Tuesday, April 2, 2013, 11:22


comments powered by Disqus