Last Updated: Thursday, September 6, 2012, 18:16
www.24taas.comमासिकासाठी टॉपलेस होणं ही अभिनेत्रीसाठी फार मानाची गोष्ट होते आहे.`एफएचएम` या मासिकाच्या मुखपृष्ठासाठी करिश्माने टॉपलेस फोटोशूट केले आहे. असे करुन करिश्मा पूनम पांडे आणि वीणा मलिक यांच्या पंगतीत आली आहे. आजपर्यंत टीव्ही जगतातील कोणत्याही अभिनेत्रीने टॉपलेस होऊन फोटोशूट केलेले नाही.
मॅग्झिनसाठी टॉपलेस होणारी करिश्मा पहिली टीव्ही अॅक्ट्रेस ठरली आहे. अलीकडेच `एफएचएम`च्या कव्हरपेजवर अभिनेत्री हुमा कुरैशी झळकली होती. या मासिकाच्या आगामी एडिशनमध्ये करिश्मा टॉपलेस झळकणार आहे.
छोट्या पडद्यावर करिश्माने अनेक कार्यक्रमांचे सुत्रसंचालन केले आहे. शिवाय ती बॉबी देओल आणि अक्षय कुमारच्या `दोस्ती` चित्रपटातही झळकली होती. करिश्मा अनेक टीव्ही मालिकांमध्येही झळकली आहे. करिश्माची क्योकिं `सास भी कभी बहू थी` ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. अलीकडच्या काळात करिश्मा `लॅक्मे फॅशन वीक`मध्ये करिश्मा केन फर्न्सची शोस्टॉपर ठरली होती. करिश्मा`मस्ती` सिनेमाच्या सिक्वेलमध्येही झळकणार आहे.
First Published: Thursday, September 6, 2012, 18:15