Last Updated: Monday, January 21, 2013, 16:27
www.24taas.com, मुंबईटीव्ही अभिनेता सनील सोढी याला ब्लॅकबेरी मॅसेंजरवरून एका महिलेला आपले नग्न आणि उत्तान फोटो पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली.
सनील सोढीने टीव्हीवर रिश्ते, हम यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. रविवारी रात्री मुंबई पोलिसांनी सनील सोढीला अटक केलं. सनीलने एका महिलेला आपले नग्न आणि उत्तान फोटो पाठवले. केवळ एक-दोन नव्हे, तर असे २५ फोटो पाठवले होते. ही महिला सनील सोढीची मैत्रीणच होती. माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि विद्युत उपकरणांद्वारे आक्षेपार्ह गोष्टींची देवाण घेवाण याबद्दल सनीलला सेक्शन ५०९ आणि कलम ६७ अंतर्गत सनीलला अटक करण्यात आलं.
सनील सोढीने बॉलिवूडच्या सिनेमांमध्येही काम केले होते. गुलजार दिग्दर्शित ‘हूतूतू’ सिनेमात सनीलने तब्बू, सुनील शेट्टी आणि नाना पाटेकरसोबत अभिनय केला होता. तर, ‘हजार चौरासी की माँ’ या सिनेमात जया बच्चन आणि नंदिता दासबरोबर भूमिका केली होती.
First Published: Monday, January 21, 2013, 16:26