Last Updated: Sunday, June 15, 2014, 17:29
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबईप्रेषकांचा आठवडयाचा विरंगुळा म्हणून हा कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरला आहे. परंतु त्याचा प्रवास सप्टेंबरपर्यंतच असून पुन्हा नव्या रुपात परत येऊ, असं ही कपिलने ट्विटमध्ये सांगितलं .
कपिलने रविवारी ट्विट केलं की, सप्टेंबरला कॉमेडी नाइटस बंद होणार आहे. आम्ही नवीन कलाकार आणि नव्या सेटसह परत येऊ. तो पर्यंत... हसत राहा...
अजून एका ट्विटमध्ये कपिलनी लिहीलं आहे की, ‘कॉमेडी नाइटससाठी असलेल्या प्रेमाबद्दल आभारी, हसत राहा आणि खुश रहा...
जून 2013 ला सुरु झाला होता कार्यक्रम‘कॉमेडी नाइटस विथ कपिल’ ची सुरुवात 22 जून 2013 ला झाली होती. आठवडयातील शनिवार आणि रविवार प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा टीआरपी सर्वांत टॉपवर असलेला मानला जातो.
हा शो ब्रिटीश मधल्या द कुमार्स एट नंबर- 42 सारखा शो असल्याचं समजतं, कपिल शर्मा या कार्यक्रमाचं होस्ट आणि त्याच्या विनोदाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कार्यक्रम दरम्यान झालेली घटना
25 सप्टेंबर 2013 ला ह्या कार्यक्रमाच्या सेटवर आग लागल्याने पूर्ण सेट जळून खाक झाला होता.
त्याच्यानंतर कपिलला बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, लता मंगेशकर अशा मोठया लोकांनी मदत केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 15, 2014, 11:52