जेव्हा सलमान करतो शाहरुखसाठी बॅटींग, When Salman Khan batted for Shah Rukh Khan…

जेव्हा सलमान शाहरुखसाठी बॅटींग करतो...

जेव्हा सलमान शाहरुखसाठी बॅटींग करतो...
www.24taas.com, मुंबई

सध्या कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूडच्या दबंग खान चक्क आपला प्रतिस्पर्धी शाहरुख खानची पाठराखण करताना दिसला... थोडं आश्चर्य वाटलं का वाचून... होय ना, पण हे खरं आहे.

झालं असं की, बिग बॉसच्या घराचा सध्याचा कॅप्टन निकेतनला घराबाहेबर काढण्यासाठी इमाम सिद्दीकीनं नॉमिनेट केलं पण यावेळेस कॅप्टनला कुणीही नॉमिनेट करू शकत नाही हा नियम तो जाणूनबुजून विसरला. त्यानंतर कार्यक्रमाचा होस्ट सलमान आणि इमाममध्ये वाद सुरू झाला. तू नियमाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, हे सलमाननं इमामला समजावण्याचा प्रयत्न केला. पण, ऐकेल तो इमाम कसला... यावेळी इमामनं आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी ‘बिग बॉस’चा एक स्पर्धक इमाम सिद्दीकी यानं ‘शाहरुख खानला मीच स्टार बनवलं’ असा दावा केला आणि चक्क सलमान चिडला. सलमाननं यावर इमामला चांगलंच फैलावर घेतलं.

‘मी प्रिती झिंटा आणि शाहरुख खानला जाहीरातींसाठी कास्ट केलं होतं आणि त्यांना लोकांनी पसंती दिली’ असं इमामनं म्हटल्यानंतर सलमान चांगलाच तापला. ‘शाहरुख इंडस्ट्रीमध्ये आज जो काही आहे तो केवळ त्याच्या मेहनतीमुळे आणि त्याच्या चाहत्यांमुळे... खूप कष्टानं तो आजवर इथपर्यंत पोहचलेला आहे केवळ तू त्याला एका जाहिरातीत कास्ट केलंस म्हणून नाही’ असं खणखणीत आवाजात त्यानं इमामला सुनावलं.

याचवेळेस आपल्याला बिग बॉस या शोमध्ये सहभागी होता यावं, यासाठी इमाम सिद्दीकी लाचार होऊन दररोज खेटा घालत, एसएमएस करत होता, असा खुलासाही सलमाननं यावेळी केला.

First Published: Tuesday, January 1, 2013, 13:25


comments powered by Disqus