Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:46
सोनी टीव्हीवरील `बडे अच्छे लगते है` मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय आहे. वेळोवेळी येणारे या मालिकेमधले ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ या मालिकेची लोकप्रयता वाढवत आहेत. याशिवाय या मालिकेची लोकप्रियता वाढवत आहे छोटीशी, गोंडस ‘पिहू’
मनामध्ये तेढ असूनही ‘पिहू’खातर राम सध्या प्रियासोबत वेळ घालवत आहे. मात्र या काळात भांडणं करण्याऐवजी दोघंही एकमेकांच्या जवळ येऊ लागल्याची शक्यता वाढली आहे. पिहू दोघांना भांडूच देत नाहीये. आइस्क्रीम खाणं, शाळेत सोडायला जाणं या गोष्टी करत करत राम-प्रिया मधील अंतर कमी होत चाललंय
पिहूसारखी क्यूट मुलगी असल्यामुळे राम जास्त वेळ प्रियावर रागावू शकणार नाही अशी कल्पना दिसते आहे. मात्र त्यांच्यात पूर्वी उडालेले खटके आणि आता वाढू लागलेली जवळीक यांचा पुढे काय परिणाम होणार आहे, हे पाहाणं उत्कंठावर्धक ठरेल. पिहू वडिलांकडेच राहाणार की आईकडे याचंही उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल. पण, त्यापेक्षा पिहूमुले राम आणि प्रिया दोघेही एकत्र येतील का?
First Published: Wednesday, October 24, 2012, 16:46