१४ वर्षांचा मुलगा मोडणार उसैन बोल्टचा रेकॉर्ड, 14-year-old record Usain Bolt modanara

१४ वर्षांचा मुलगा मोडणार उसैन बोल्टचा रेकॉर्ड

१४ वर्षांचा मुलगा मोडणार उसैन बोल्टचा रेकॉर्ड
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळख असलेला उसैन बोल्ट यांच्या नावावर अनेक वेगवेगळे रेकॉर्ड आहे. मात्र हे रेकॉर्ड अजून कोणीही मोडू शकलेल नाही. परंतु आता उसैन बोल्टला टक्कर देण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये १४ वर्षाचा मुलगा सज्ज झालाय.

हा मुलगा उसैन बोल्ट पेक्षाही वेगाने धावतो. त्याचे रेकॉर्ड बुक पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येत. या ऑस्ट्रेलियाच्या मुलाने २०० मीटर धावण्याची स्पर्धा २१.७३ सेकेंदमध्ये पूर्ण करत आपल्या नावावर त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. त्याच्या खेळाचे प्रदर्शन वर्ल्ड रेकॉर्डर उसैन बोल्ट पेक्षाही उत्कृष्ट होते.

उसैन बोल्टने १४ वर्षाचा असताना या वयात केलेल्या रेकॉर्डपेक्षा ०.०८ सेकंद पेक्षा कमी वेळ घेतला आहे. बोल्टला मागे टाकणारा १४ वर्षीय जेम्स ग्लॉफर हा न्यू साऊथ वेल्सचा साऊथ कोस्ट या भागात राहणारा आहे. २०१६ मध्ये रियो डी जेनरो येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जेम्स ग्लॉफर हा चांगल्याप्रकारे प्रदर्शन करण्यास तयार आहे.

उसैन बोल्टने वर्ल्ड रेकॉर्ड २००९ मध्ये बर्लिन विश्व स्पर्धेत १०० मीटरचे अंतर ९.५८ सेकंदामध्ये पूर्ण करुन रेकॉर्ड आपल्या नावावर केला. हा रेकॉर्ड कोणताही धावपटू मोडू शकला नाही. याशिवाय याच चॅम्पियन्सशिपमध्ये उसैन बोल्टने २०० मीटरमध्ये १९.१९ सेकंद नोंदवत रेकॉर्ड केला होता.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 17, 2013, 16:02


comments powered by Disqus