सिक्सर किंग गेलच्या ६ हजार धावापूर्ण chris gayle cross 6 thousand runs

सिक्सर किंग गेलच्या ६ हजार धावा पूर्ण

सिक्सर किंग गेलच्या ६ हजार धावा पूर्ण
www.24taas.com, झी मीडिया, दुबई

सिक्सर किंग ख्रिस गेलने `आयपीएल` ७च्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये एक नवीन विक्रम केला आहे. गेलने टी-20 क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा गेल हा प्रथमच खेळाडू आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत असलेला ख्रिस गेल दुखापतीमूळे पहिल्या चार मॅचेससाठी मूकला होता. पण आपल्या पहिल्याच मॅचची सुरूवात गेलने किंग्स इलेवन पंजाब विरूद्ध केली. खेळाची सुरूवात करताना मॅक्सवेसच्या पहिल्याच ओवरमध्ये गेलने दोन चौकार आणि दोन सिक्सर मारले. गेलला ६ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी ८ धावांची गरज होती. या चौकार आणि सिक्सर सोबतच गेलने ६ हजार धावांचा टप्पा पार केला.

गेलच्या नावावर सध्या १६५ मॅचेसमध्ये ६ हजार १२ धावा जमा आहेत. यात ११ शतक आणि ३९ अर्धशतक गेलने ठोकले आहेत. गेल पाठोपाठ टी20 क्रिकेटमध्ये जास्त धावा करण्यात ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉजचा नंबर लागतो. हॉजने आतापर्यंत २१८ मॅचेसमध्ये ५ हजार ९८५ धावा केल्या आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 10:22


comments powered by Disqus