Last Updated: Saturday, January 4, 2014, 23:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई भारतानं पाकिस्तानचा 40 धावांनी हरवून 19 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया क्रिकेट चषकावर जिंकला आहे. या विजयात जालन्याचा विजय झोल आणि केरळचा संजू सॅमसन यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे.
विजय झोल आणि संजू सॅमसनच्या कामगिरीच्या जोरावर, भारतीय संघाने 50 षटकांत आठ बाद 314 धावा केल्या आहेत. विजय झोल आणि संजू सॅमसन या दोघांनी शतकं केली आणि तिसऱ्या विकेटसाठी 180 धावांची भागीदारी रचली आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी यानंतर पाकिस्तानला 50 षटकांत नऊ बाद 274 धावांत रोखलं, आणि आपल्या संघाचा विजय निश्चित केलाय भारताच्या कुलदीप यादवनं तीन, तर सीव्ही मिलिंद, दीपक हूडा, आमीर गनी यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केलं
भारतीय युवा संघानं पाकिस्तानला धूळ चारत आशिया चषक जिंकला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 4, 2014, 23:11