मुंबई इंडियन्सचा अखेर पहिला विजय Mumbai Indians get 1st victory

मुंबई इंडियन्सचा अखेर पहिला विजय

मुंबई इंडियन्सचा अखेर पहिला विजय

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयपीएलच्या सातव्या पर्वामध्ये दूबईत पाचही सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्सला भारतात अखेर सहाव्या सामन्यात आपला पहिला विजय मिळवला आहे. मॅचमध्ये टॉस जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी केली. किंग्ज इलेव्हन पंजाबला १६८ धावांमध्ये रोखल्यानंतर मुंबईने ५ विकेट्स आणि ५ बॉल ठेऊन हा सामना जिंकला.

सामन्यात मुंबई इंडियन्सच्या कोरे अ‍ॅन्डरसनने आपली ऑलराऊंडरची भुमिका चांगलीच निभावली. अ‍ॅन्डरसनने सामन्यात धावांचा पाठलाग करताना, आपल्या ३५ धावांच्या मदतीने विजयात महत्वाची भुमिका निभावली. याच कारणाने अ‍ॅन्डरसन `मॅन ऑफ द मॅच`चा किताब देण्यात आला. सामन्यात सी. एम. गौतमने ३३ धावा, तर कॅप्टन रोहित शर्माने ३९ धावा केल्या.

शेवटच्या तीन षटकांमध्ये किरॉन पोलार्ड आणि आदित्य तरेच्या जोडीने ४१ धावा ठोकल्या. सामन्यात किरॉन पोलार्डने नाबाद २८ धावा, तर आदित्य तरे याने नाबाद १६ धावा करत मुंबई इंडियन्सला पहिला विजय मिळवून दिला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 4, 2014, 11:53


comments powered by Disqus