Last Updated: Tuesday, May 13, 2014, 18:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई जागतिक क्रिकेटमध्ये `द वॉल` या नावाने प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड संघाच्या पाठीशी असणे, म्हणजे माझे भाग्य असल्याचे शेन वॉटसनने म्हटलंय.
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार शेन वॉटसन सांगतोय की, `राहुल द्रविड निवृत्तीनंतरही संघाच्या पाठीशी आहे, हे माझे भाग्यचं आहे. मी नशीबवान आहे, कारण मला राहुलसोबत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. माझ्या खेळांचे श्रेय काही प्रमाणात राहुल द्रविडला आहे.
इतकंच नाही तर, संघात राहुल खेळत नसला तरीही, त्याचं आमच्या पाठीशी असणे, हे खूप महत्त्वाचं आहे. तसेच त्याच्याकडून आमच्या संघांला नेहमी खेळण्याची नवी दिशा मिळाली असा विश्वासही वॉटसनने व्यक्त केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 13, 2014, 18:39