वीरू-गौतीची आक्रमकता लोप - Marathi News 24taas.com

वीरू-गौतीची आक्रमकता लोप

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही दिल्लीकर जोडी पहिल्या दोन वन-डेमध्ये प्रतिभेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे.
 
वीरू-गौतीची या आक्रमक जोडीची मोठी इनिंग पाहण्यासाठी भारतीय क्रिकेटप्रेमी आसूसलेले आहेत. मात्र या दोघांनाही आतापर्यंत क्रिकेट फॅन्सची निराशाच केली आहे.  वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या दिल्लीकर जोडीने आतापर्यंत भारताला अनेक अवस्मिरणीय विजय मिळवून दिलेय. मात्र या जोडीला जणू काही कुणाची दृष्ट लागली. दोघांच्याही बॅट्स सध्या शांत आहे.
 
वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन-डेसारिजमध्ये एकीकडे युवा प्लेअर्स जबरदस्त कामगिरी करत असताना ही अनुभवी जोडी मात्र आपल्या प्रतिभेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत.  पहिल्या दोन्हीही वन-डेमध्ये सेहवाग टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देण्यात अपयशी ठरलाय. सेहवाग दोन वन-डेमध्ये 23 च्या सरासरीने 46 रन्सच करू शकलाय. 26 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी त्याला शोभेशी अशी नाही. गंभीर तर दोन वन-डेमध्ये 8 च्या सरासरीने 16 रन्सच करू शकलाय. 12 रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
 
सेहवाग-गंभीरची अशा प्रकारची खराब कामगिरी त्यांच्या फॅन्सला मुळीच रूचणारी नाही. म्हणूनच ही दिल्लीकर जोडी पुन्हा केव्हा एकदा फॉर्मात येतेय आणि फोर सिक्सची बरसात बघायला मिळतेय याचीच वाट क्रिकेट फॅन्स पाहताहेत. जर ही दिल्लीकर जोडी पुन्हा फॉर्मात आली तर टीम इंडियासाठी आगामी मॅचेस जिंकण अधिकच सूकर होईल.

First Published: Saturday, December 3, 2011, 09:59


comments powered by Disqus