नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर धोनी ? - Marathi News 24taas.com

नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर धोनी ?


झी २४ तास वेब टीम, रांची
 
गेल्या काही महिन्यांपासून झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झालीय. माओवादी आणि दहशतवाद्यांकडून धमक्‍या मिळाल्याच्या वृत्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची सुरक्षितता वाढविण्यात आली आहे.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात वाढ झालीय. रेल्वे लाईनपासून पोलिस स्टेशनपर्यंत सर्वच ठिकाणांवर नक्षल्यांनी हल्ल्यांचं सत्र सुरू केलंय. त्यातच झारखंड पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीमुळे झारखंड पोलिसांची झोपच उडाली असून. आता नक्षलवाद्यांचा पुढील निशाणा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी असल्याचं सांगण्यात येतंय. याच मिळालेल्या माहितीनंतर तात़डीने माहिच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
आता झारखंड जिल्हा पोलिसांऐवजी माहिच्या सुरक्षेची जबाबदारी झारखंडच्याच आर्म्ड पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. हरमू हौसिंग सोसायटीतील धोनीच्या निवासस्थानी चोवीस तास पहाऱ्यासाठी स्थानिक पोलिसांचे विशेष पथक तैनात केले आहे. खबऱ्यांकडून या संदर्भातील माहिती मिळाल्याने ही व्यवस्था केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात धोनी, त्याची पत्नी साक्षीसह रांचीमध्ये दाखल झाला आहे.
 
नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर महेंद्र सिंग धोनीचं नावं येण्यानं झारखंड पोलिसांची झोपच उडालीय. याआधी माहिच्याच कुटूंबियांनी खंडणीकरता धमकीचं पत्र आल्याची तक्रार पोलिसांत केली होती. तसंच यावर्षी चंडीगढमध्ये त्याचे दोन सुरक्षारक्षक नशेच्या अवस्थेत सापडले होते. त्यामुळेच करोडो क्रिकेट प्रेमींचा लाडका असणा-या कॅप्टन धोनीच्या सुरक्षेबाबत, कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यास झारखंड पोलीस तयार नाही आहेत.
 

 
 
 

First Published: Thursday, December 8, 2011, 06:22


comments powered by Disqus