BCCI अध्यक्षांची CBI चौकशी - Marathi News 24taas.com

BCCI अध्यक्षांची CBI चौकशी

www.24taas.com, हैदराबाद
 
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) एन. श्रीनिवासन यांची चौकशी केली.
 
वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी   श्रीनिवासन यांची चौकशी झाली. या चौकशीदरम्यान श्रीनिवासन यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जगनमोहन यांची कंपनी असलेल्या इंडिया सिमेंटसमध्ये केलेल्या गुंतवणुकीविषयी माहिती घेतली.
 
इंडिया सिमेंटस ही सिमेंट कंपन्यांपैकी अशी एक कंपनी आहे. ज्यामध्ये गुंतवणूक असलेल्या व्यक्तींची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. जगनमोहनच्या मालकीच्या भारती सिमेंटस आणि जगाती पब्लिकेशनमधून अवैधरित्या इंडिया सिमेंटसला पैस पुरविल्याचा आरोप आहे.

First Published: Monday, June 18, 2012, 18:32


comments powered by Disqus